पाचोऱ्यात नैसर्गिक आपत्ती निधीत ‘अपहारकांड’ ; लिपिक भोई तडकाफडकी निलंबित

सप्टेंबर 3, 2025 8:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नैसर्गिक नुकसान भरपाईची सव्वा कोटी रक्कम पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा प्रकार चौकशीदरम्यान उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लिपिक भोई याला तडकाफडकी निलंबित केले असून या कारवाईने खळबळ उडाली. या प्रकरणात वसुली मोहिम जोरात राबविण्याची आणि रक्कम वसुल न झाल्यास भोईंच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्यादृष्टीने तयारी ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत.

प्रतीकात्मक फोटो

काय आहे प्रकरण?

नैसर्गिक आपत्ती निधीच्या वाटपात १ कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचे ‘अपहारकांड’ अमोल भोईने घडवून आणला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार विजयकुमार बनसोडे यांनी अनुदानाची रक्कम ज्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या संबंधित २२५ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसाद्वारे अनुदानाची रकम शासन तिजोरीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तहसील प्रशासनाने १० जणांच्या बँक खात्याची ई-केवायसी लॉक केले आहे. त्यामुळे २२५ पैकी २१५ जणांना नोटिसा मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या भितीने तहसीलदार कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर संबंधित खातेधारक भोईचे मित्रांसह विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

भोई मित्रांसह काही विद्यार्थ्यांना हाताशी धरायचा. माझ्या बँक खात्याला प्रॉब्लेम आलाय, असे सांगून मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा तपशील मिळवायचा. त्यानंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करायचा. त्यानंतर बँकेतून पैसे काढून घ्यायचा. भोईची ही गुन्हेगारी ऐकून प्रशासनही थक्क झाले आहे.

Advertisements

३४ जणांनी भरले पैसे

नोटिसा बजावल्यानंतर सोमवारपर्यंत ३४ जणांनी अनुदानाची रक्कम शासन तिजोरीत भरली असल्याची माहिती तहसीलदार बनसोडे यांनी दिली. दरम्यान, पैसे न भरणाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भोई निलंबित

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लिपीक भोईला तडकाफडकी निलंबित केले आहेत. सोमवारी सायंकाळी तसे आदेश काढले आहे त्यासोबत या प्रकरणात वसुली मोहिम जोरात राबविण्याची आणि रक्कम वसुल न झाल्यास भोईंच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्यादृष्टीने तयारी ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now