जळगाव लाईव्ह न्यूज । निवडणुकीतील नगरपरिषदेच्या कामावरून वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने १६ ते १७ जण जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी (दि.१८) घडली. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुले व महिलांचाही समावेश आहे.

निवडणुकीत आमचे काम न करता इतरांचे का केले या कारणावरून वाद झाला. अचानक उसळलेल्या हाणामारीने परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टाळला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.हाणामारीच्या घटनेनंतर जखमी पोलिस ठाण्यात गेले. तेथे पुन्हा वाद झाला. २०० ते २५० जणांचा जमाव जमा झाला होता. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

जखमी झालेल्यांची नावे
शेख अमीन शेख बाबू (४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (५६), मोईल अब्दल ररुफ (२२) आकिब नवाब, अब्दुल महेमूद (२८), रिजवान रऊफ खान (२८), आवेश जहांगीर शेख (२४), अबुजर जहाँगीर शेख (२०), सैयद नावीद सैयद आरिफ (२२), सैयद आसिफ सैयद रशीद (४२), हसनैन सैयद आरीफ (१४), मुश्ताक शेख नवीद (१६), गुलाम मोहम्मद अली (२१), दानिश सैयद रफिक (२३), आरीफअली रशीद अली (४७), रजिया जुल्फिकार अली (४७), शेख मुस्तकीम शेख अन्वर (३०) हे जखमी झाले. त्यांच्यावर जीएमसीत उपचार सुरू आदेत




