जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२६ । जळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला अनेक ठिकाणी जळगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला दिसत आहे. यातच शहरातील आशाबाबा नगर परिसरातील नागरिकांचा व मंडळांचा भाजप उमेदवार शेखर अत्तरदे यांना पाठिंबा जाहीर केला.

महायुतीमधील भाजपचे अधिकृत उमेदवार शेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा आज दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता आशाबाबा नगर स्टेट बँक कॉलनी, आर एम एस कॉलनी, पंडितराव नगर शामराव नगर माऊली नगर या परिसरामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळून जागोजागी महिला भगिनींनी ऑप्शन करून फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. सदर अशा बाबा परिसर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार शेखर भाऊ अत्तरदे यांना प्रचंड प्रतिसाद देऊन पाठिंबा जाहीर केला.

या रॅलीप्रसंगी नगरसेवक पदी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार दीपमालाताई काळे विशाल भोळे, अंकिता पाटील माजी नगरसेवक, पिंटू काळे नितीन नन्नवरे, मनोज भांडारकर, जितेंद्र चव्हाण तसेच अशाबाबा परिसर मित्र मंडळाचे विलास कोळी भरत सैंदाणे, विश्वनाथ सैंदाणे, तुषार ठाकरे, चंदन कोळी, दामू चव्हाण, अशोक साळी, प्रशांत पाटील, योगेश शिंपी, ग्रीस्सेंदाने योगेश बारी, किशोर नन्नवरे, मिस्तरी काका या असंख्य नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी जागोजागी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या महिला भगिनींनी त्यांना ऑक्शन करून विजयी होण्याचे आशीर्वाद दिले.






