जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करत सरकारवर गंभीर आरोप केले होते. सोमवारी या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राइव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली आहे. तसेच, या प्रकणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचाही राजीनामा आला असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पेन ड्राइव्ह सगळे दिलेले नाहीत. काही राखून ठेवले आहेत. परंतु, हे प्रकरण तुमचा आरोप काही असला तरी सुद्धा मी कोणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे प्रकरण तपासावे लागेल. या घटनेच्या मागे कोण आहे आणि ही घटना कशापद्धतीने पुढे घेऊन जायची. यात कोण संबंधित आहेत. त्याच्यावर काय कारवाई करायची हे पाहावे लागेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, ऍड.प्रवीण चव्हाण यांच्या राजीनामामुळे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसू लागले आहे. त्यातच सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला आहे. विधिमंडळ सध्या जोरदार गाजत असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा खेळ पाहायला मिळत आहे.