चारधाम यात्रेला गेलेल्या चोपड्याच्या महिलेचा दुर्दैवी निधन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून तातडीने मदत

मे 2, 2026 1:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील भाविक महिलेचा उत्तराखंडमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) असं मयत महिलेचं नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

pratibha borole

चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा बोरोले या धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत चोपड्यातील १६ भाविकांचा एक गट यात्रेसाठी गेला होता. यात्रेदरम्यान या सर्वांनी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या पवित्र स्थळांचे अतिशय उत्साहात दर्शन घेतले.यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिराचे दर्शन नियोजित होते. मात्र, दर्शनाच्या आदल्या दिवशीच त्यांची प्रकृती अचानक खालावली. रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सहप्रवाशांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी धावपळ केली.

प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना तातडीने चमोली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर १ मे रोजी सकाळीच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

प्रतिभा बोरोले या चोपडा येथील माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी, तर पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या भावजाई होत्या. तसेच चोपड्याचे उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या त्या काकू होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने बोरोले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

या दुःखद घटनेनंतर बोरोले कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ पावले उचलली. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि शासकीय समन्वयामुळे प्रतिभा बोरोले यांचे पार्थिव उत्तराखंडमधून विमानाने मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now