---Advertisement---
यावल

चितोडा येथे मुतारी प्रश्न मार्गी लागेना ; दोन महिण्यापासून निधी उपलब्ध, तरी पण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । यावल तालुक्यातील चितोडा येथे अवघ्या गावात पुरुषांसाठी एकच मुतारी असल्याने मोठी गैरसोय होत आहे. गावातील ग्रामपंचायतजवळील मुतारी मागील गेल्या अनेक वर्षांपासून जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून याकडे ग्रामपंचायत अक्षरशः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे निधी उपलब्ध होऊनही काही कामांचा ठरावच मंजूर केला जात नसल्याचे देखील समोर आले.

chitoda jpg webp webp

गावातील ग्रामपंचायत जवळ या अगोदर मुतारी होती ती ही काही वर्षापुर्वी जमीनदोस्त झाली. तर गावात फक्त शाळेजवळ एकच मुतारी आहे. यामुळे मुतारी नसल्याने असुविधा होत आहे. त्यामुळे पुरुषांची मोठी गैरसोय होतेय. पुरुषांना आपली नैसर्गिक विधीसाठी नाईलाजास्तव कुठेही भिंतीचा आडोसा शोधून आपली नैसर्गिक विधी पार पाडतानाचे विदारक चित्र बऱ्याच वेळा दिसून येते.

---Advertisement---

किमान ग्रामपंचायत जवळील नवीन मुतारी होणे अपेक्षित होते तरी देखील याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला गेल्या दोन महिन्यापासून निधी उपलब्ध झाल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली. चितोडा ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर रोजी पार पडली. मात्र त्यापूर्वी दीड ते दोन महिन्यापासून ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झालेला आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी गावात अनेक कामे मार्गी लागले असते. मात्र याकडे सोयीनुसार दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत जवळील मुतारीबाबत ग्रामसेवक यांना विचारण्यात आले असता निधी मिळत नसल्याने हा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे सांगितले. मात्र दोन महिन्यापासून ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र निधी उपलब्ध असतानाही माजी सरपंचसह सदस्यांकडून कामांबाबत ठरावच मांडला नसल्याचेही ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी सांगितले.

मात्र, आता निवडणुकीनंतर सरपंच यांनी आपला पदभार स्वीकारला असून उपलब्ध निधीमधून आता गावातील पुरुषांच्या मुतारीसह अनेक कामे मार्गी लागणे अपेक्षित आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---