---Advertisement---
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव दौऱ्यावर ; असे कार्यक्रमाचे नियोजन?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या म्हणजेच 16 फेब्रुवारी, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

eknath shinde jpg webp

गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2.30 मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.

---Advertisement---

दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व पुढीलप्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण 1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. 2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख. 3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी. 4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी. 5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी. 6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी. 8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. 9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

सायंकाळी 5.15 वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.55 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे आगमन. सायंकाळी 6.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा. सायंकाळी 7.30 वाजता राखीव, रात्री 8.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---