जळगाव शहर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेही होते.
जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी तहसीलदार नामदेव पाटील आदि उपस्थित होते.