जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । केमिकल टँकर व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील महामार्गावरील सर्वे गावाजवळ घडलीय.
याबाबत असे की, जळगावकडून धुळ्याकडे जाणारी केमिकल टँकर (एमएच४८/बीएम७४८०) व समोरून येणारी (जीजे३२टी ८९५६) हिने केमिकल टॅंकरला जोरदार धडक दिली. त्यात टँकरचालक किरकोळ स्वरूपाच्या जखमी झाला व जोरदार धडकेने टँकरचा डिझेल टॅंक फुटले असल्याने रस्त्यावर डिझेल पडले होते.
यावेळी पारोळा पोलीस दल व अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सर्वत्र डिझेलचा साठा सांडलेला असल्याने रहदारीस अडथळा येत होता. अशावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील वानखेडे, विजय भोई आदींनी व अग्निशामक दलाचे मनोज पाटील यांनी पाण्याच्या सहाय्याने रस्त्यावरील सांडलेले डिझेल बाजूला केले. त्यानंतर रहदारी मोकळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार होता.