उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार 5 एप्रिल रोजी पाचोरा, पहिला मंगळवार 6 एप्रिल 2021 रोजी अमळनेर, पहिला बुधवार 7 एप्रिल रोजी सावदा, दुसरा सोमवार 12 एप्रिल रोजी चोपडा, तिसरा सोमवार 19 एप्रिल रोजी यावल, तिसरा गुरुवार 15 एप्रिल रोजी जामनेर, दुसरा व पाचवा गुरुवार 8 व 29 एप्रिल रोजी भुसावळ, तिसरा मंगळवार 20 एप्रिल रोजी धरणगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.
चौथा सोमवार 26 एप्रिल रोजी भडगाव, चौथा मंगळवार 27 एप्रिल रोजी बोदवड, चौथा बुधवार 28 एप्रिल रोजी मुक्ताईनगर, चौथा गुरुवार 22 एप्रिल रोजी रावेर, चौथा शुक्रवार 23 एप्रिल रोजी पारोळा, आणि दुसरा, तिसरा, पाचवा शुक्रवार 9, 16 व 30 एप्रिल रोजी चाळीसगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द समजण्यात येईल. सर्व संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.