प्रवाशांनो लक्ष द्या! जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

जुलै 25, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । जळगाव आणि भुसावळ मार्गे नवी दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उत्तर-मध्य रेल्वेच्या आग्रा विभागांतर्गत मथुरा स्थानकादरम्यान अप व डाऊन रेल्वेमार्गावर तांत्रिक कनेक्शनचे काम तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी मथुरा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

train

या गाड्यांच्या मार्गात बदल

गाडी क्र १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस १ ऑगस्ट रोजी आग्रा कॅट, मितावली, गाझियाबाद, नवी दिल्लीमार्गे अमृतसरला जाईल.

Advertisements

गाडी क्र. १२६१७ : एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस तसेच क्र.१२६२९ यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या ३१ जुलै रोजी आग्रा कॅट, मितावली, गाझियाबादमार्गे निजामुद्दीन येथे पोहोचतील.

Advertisements

क्र. ११०७८ : जम्मूतावी- पुणे एक्स्प्रेस ही गाडी ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी नई दिल्ली, गाझियाबाद, मितावली, आग्रा कॅटमार्गे पुण्याकडे धावेल.

क्र. १२७१६ : अमृतसर नांदेड एक्स्प्रेस १ व २ ऑगस्ट रोजी नई दिल्ली, गाझियाबाद, मितावली, आग्रा कॅटमार्गे नांदेडला पोहोचेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now