---Advertisement---
पाचोरा

मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्र्यांच्या पाचोरा दौऱ्यात पुन्हा बदल; आता ‘या’ तारखेला येणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । पाचोरा शहरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता 9 सप्टेंबर ऐवजी 12 सप्टेंबर ला होणार असल्याचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे. 9 तारखेला मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

eknarh shinde jpg webp webp

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (Eknath Shinde) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी होणारा दि.२६ ऑगस्ट रोजीचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता त्यानंतर हा दौरा ९ सप्टेंबर रोजी होईल असे सांगत आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र त्यात पुन्हा एकदा बदल झाला असून आता हा दौरा १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आ.किशोर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

---Advertisement---

पाचोरा-भडगाव तालूकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी ना.एकनाथराव शिंदे यांचेसह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत,पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना,. अनिल पाटील,ना.अब्दुल सत्तार, ना.दादा भुसे, ना.डॉ तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपास्थिती लाभणार आहे.

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा निहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय’ शासन आपल्या दारी’हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल,ऑक्सिजन पार्क या सह विविध विकास कामांचे देखील भूमीपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले असुन याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आ.किशोर अप्पा पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी या पूर्वीच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.

नर्मदा ऍग्रोचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपल्यावर नांद्रा ता. पाचोरा येथील नर्मदा ऍग्रो या फॅक्टरीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण ,खासदार,आमदार व सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा पाचोरा दौरा ९ सप्टेंबर रोजी निश्चित झाला होता. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली ठरल्याने हा कार्यक्रम आता 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सुमारे दहा ते बारा मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
किशोर अप्पा पाटील
आमदार- पाचोरा-भडगाव

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---