---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र

प्रवाशांनो लक्ष द्या! जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या 45 रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । देशात सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेकडे पाहिलं जाते. दररोज रेल्वेनं (Indian Railway) करोडोच्या संख्येने प्रवाशी यात्रा करतात. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून रेल्वेचं नवीन वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. त्यात ४५ जळगाव (Jalgaon), भुसावळमार्गे (Bhusawal) धावणाऱ्या रेल्वेंच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासून प्रवास करावा. जेणेकरून गैरसोय होणार नाही. Railway New Time Table

train time teble

भुसावळ विभागातील ३२ पॅसेंजर, मेमू विशेष क्रमांक असलेल्या गाड्या नियमित क्रमांकासह नवीन वर्षापासून धावू लागल्या आहेत. नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून त्या रेल्वेंची यादी प्रसिद्ध केली आहे. रेल्वेच्या ऑनलाइन सिस्टिमसह अॅपमध्ये रेल्वेच्या नवीन वेळांसह क्रमांकांचे काम ३१ डिसेंबरच्या रात्री पूर्ण झाले. यात रेल्वेशी संलग्न रेल्वे अ‍ॅपवर अपडेट वेळेसह क्रमांक प्रवाशांना बघायला मिळणार आहे. दरम्यान, जे अ‍ॅप रेल्वेशी संलग्न नाहीत, अशा खासगी अ‍ॅपवर मात्र अपडेट माहिती प्रवाशांना मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष स्थानकावर जाऊन रेल्वेचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे

---Advertisement---

या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल?
वेळेत बदल झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये ११०३९ कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक-शालिमार एक्स्प्रेस, १२१०२ शालिमार-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे एक्स्प्रेस, १२१४५ लोकमान्य टिळक-पुरी एक्सप्रेस, १२१४६ पुरी-लोकमान्य टिळक एक्सप्रेस, १२१५१ लोकमान्य टिळक-शालिमार एक्स्प्रेस, १२१५२ शालिमार-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२२२१ पुणे-हावडा दुरंतो एक्स्प्रेस, १२२६१ मुंबई-हावडा दुरंतो एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८१० हावडा- मुंबई मेल, १२८११ हटिया एक्स्प्रेस, १२८१२ हटिया- लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस, १२८४३ पुरी-अहमदाबादी एक्स्प्रेस, १२८५० पुणे-बिलासपुर एक्सप्रेस, १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस, १३४२५ मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेस, १२८५९/१२८६० गीतांजली एक्स्प्रेस, १२८६९ मुंबई-हावडा, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, १२८७९/१२८८० भुवनेश्वर एक्स्प्रेस, १२९०५ पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस, १२९०६ शालिमार-पोरबंदर एक्सप्रेस, १२९९३ गांधीधाम पुरी एक्सप्रेस, १२९९४ पुरी गांधीधाम एक्स्प्रेस, १३४२६ सुरत मालदा टाउन एक्स्प्रेस, १३४२५ मालदा टाउन सुरत एक्स्प्रेस, २०८२१ पुणे संतरागाची एक्स्प्रेस, २०८२२ संतरागाची पुणे एक्स्प्रेससह ४५ रेल्वेंच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे.

येथे चेक करता येणार वेळापत्रक?
नवीन वर्षापासून नवीन वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्यांच्या वेळेत होणारा अंशतः बदल पाहता प्रवास करण्यापूर्वी एसएमएस सेवा १३९ किंवा www.indianrail.gov.in किंवा www.trainenquiry या वेबसाइटद्वारे ट्रेनच्या वेळा तपासाव्या, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---