---Advertisement---
राष्ट्रीय

चांद्रयान-३ कुठवर पोहोचला? इस्रोने ट्विट करून दिली मोठी अपडेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान-३ वर खिळल्या आहेत. चांद्रयान-३ साठी आजचा दिवस खास आहे. बुधवारी पुन्हा एकदा चांद्रयान-३ ची कक्षा कमी करण्यात आली आहे. कक्षा कमी करण्याची ही शेवटची प्रक्रिया आहे.

chandrayan 3 jpg webp webp

इस्रोकडून चांद्रयान 3 वर आज महत्त्वाच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं. आज चांद्रयान 3 ला 153km x 163km कक्षेत स्थापित करण्यात आलं आहे. ही नियोजित कक्षा होती असं इस्रोकडून टि्वटकरुन सांगण्यात आलं. त्यानंतर उद्या प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल वेगळ होईल. या लँडिंग मॉड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने चंद्राच्या कक्षेत आज आणि उद्या घडणाऱ्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे.

---Advertisement---

14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले. 5 ऑगस्ट रोजी याने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर 5, 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी यानाची कक्षा चार वेळा कमी करण्यात आली आहे.

चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर लँडर उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवले आहे. याआधी 2019 मध्ये भारताने चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेरच्या क्षणी लँडरशी संपर्क तुटला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---