जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ ।मध्य प्रदेशातील बर्हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता कोसळला मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली तर सुमारे 40 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ईमारतीचा भाग कोसळल्याने सिग्नल अॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प पडली आहे. रेल्वे स्थानकावरील ही मुख्य इमारतीतत स्टेशन मास्तर यांचे कार्यालय, तिकीट खिडकी, सिग्नल अॅड टेलिकॉम विभागाचे कार्यालय आदी कार्यालये आहे. एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ अभियंता (समन्वय) राजेश चिखले यांनी चांदणी रेल्वे स्थानकावर जाऊन भेट देत पाहणी केली. ही इमारत 2004 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सिग्नल यंत्रणा ठप्प
इमारतीचा काही भाग कोसळल्याने त्यांचा परीणाम सिग्नल यंत्रणेवर झाल्याने त्याची दुरुस्ती सुरू आहे. कोसळलेला भाग दुरुस्त केला जाईल, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सांगत रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परीणाम झाला नसल्याची माहिती दिली.