जळगाव जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नोव्हेंबर 30, 2021 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचा परिणाम दक्षिणेतील राज्ये, महाराष्ट्र आणि मध्य भारतावर होणार आहे. यामुळे राज्यातील थंडी परत एकदा गायब होणार असून आज ३० नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवसांत राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलीय. जळगाव जिल्ह्यात देखील आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

rain

गेल्या काही दिवसापासून राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोघावत आहे. त्यातच आता अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे कोकण व मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisements

राज्यात आज, मंगळवारपासून दक्षिण व उत्तर कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी मराठवाड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून उन सावलीचा खेळ सुरूय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात  गुरुवार, २ व शुक्रवार, ३ डिसेंबरला काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.

Advertisements

आज या जिल्ह्याना इशारा 

आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

उद्या या जिल्ह्याना इशारा 

औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथे बुधवारी एक डिसेंबरला आणि औरंगाबाद, जालना, बीड येथे तुरळक ठिकाणी दोन डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजा; तसेच जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now