---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

IMD Alert : जळगावसह राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । हवामान खात्याने जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासात अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळेल.

Add a little bit of body text jpg webp

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज बुधवार आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

---Advertisement---

जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमान
दरम्यान, मंगळवारी जळगाव येथे सर्वाधिक तापमानाची ४३.९ सेल्सिअस नोंद झाली.गेल्या काही दिवसापासून जळगावात तापमान वाढल्याने असह्य करणारा उकाडा जाणवत आहे. या उकाड्यामुळे जळगावकर होरपळून निघत असून अशातच जळगावमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळेल.

IMD

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---