जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२५ । ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ज्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तो सामना आज रविवारी होणार आहे. आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार जाणार आहे. Champions Trophy 2025 IND vs PAK
तत्पुर्वी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. पण अजूनही अनेक महत्वाचे टप्पे पार करायचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानविरुद्धचा हायव्हॉटेज सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात पाक संघाची सुरुवात खराब झाली आहे. ग्रुप अ मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पाकच्या संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.
अ गटातून उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी गतविजेत्या पाकिस्तानला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. 2023 च्या विश्वचषकात उभय संघांमधील शेवटचा एकदिवसीय सामना अहमदाबाद येथे खेळला गेला होता. त्या सामन्यात भारताने सात गडी राखून शानदार विजय नोंदवला होता. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. 2017 मध्ये ओव्हलवर झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील संघाने विराट कोहलीच्या संघाचा पराभव केला होता. यावेळीही दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा अपेक्षित आहे आणि सामना कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.
भारत-पाक सामना मोफत कुठे पहायचा
भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 23 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (09:00 GMT) दुबई येथे होणार आहे.
क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क 18 वाहिन्यांवर दुपारी 2:00 वाजता (IST) सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंग पसंत करणाऱ्यांसाठी JioHotstar अॅप आणि वेबसाइट एकाच वेळी लाईव्ह कव्हरेज प्रदान करतील. तुम्ही जिओ हॉटस्टारवर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकता.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
Champions Trophy 2025: आजचा भारत-पाक सामना मोफत कुठे पहायचा; जाणून घ्या
