उद्या जळगावात खा.रक्षा खडसेंचे चक्काजाम आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे देण्यात आले असून उद्या शनिवारी सकाळी जळगावातील आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, हेच आंदोलन प्रत्येक तालुक्याचा ठिकाणी देखील होणार आहे,’ असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या मेळाव्याला भाजपच्या जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या बैठकीला अनुपस्थिती राहिल्याने पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच ओबीसी समजाचं राजकीय आरक्षण रद्द झालं आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडावी या मागणीसाठी तसेच राज्य शासनाच्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.