जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथील संजीवन व्यसनमुक्ती केंद्रात 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करून व्यसन मुक्ती जनजागरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी एरंडोल नगर पालिका उपाध्यक्ष आरती महाजन, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख अतुल महाजन यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी प्रास्ताविकातून व्यसनमुक्ती केंद्राच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.युवा सेना प्रमुख अतुल महाजन यांनी आपल्या मनोगतातून केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तरुण व्यसनमुक्त राहिला तरच सशक्त भारत व गांधीजींच्या स्वप्नातला भारत तयार होण्यास मदत होणार आहे म्हणून तरुणांनी व्यसनापासून लांब राहण्याचे अवाहन केले.
कार्यक्रमास केंद्राचे पदाधिकारी राजेंद्र ठाकरे,संजय बागड,गोकुळ पाटील,अजय महाजन,डॉ. उमकांत मराठे,गोरख चौधरी, भिला पाटील, पंकज महाजन, दिगंबर बोरसे सह व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण उपस्थित होते.