डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

फेब्रुवारी 24, 2026 3:59 PM

हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

Dr up

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याने नवी दृष्टी मिळाली आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या टीमने ह्या शस्त्रक्रिया केल्या.

Advertisements

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयाच्या माध्यमातून खान्देश व विदर्भातील ६६ रूग्णांवर मोतिबींदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉ. उल्हास पाटील यांनी रूग्णांशी संवाद साधला. त्यावेळी रूग्णांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयामुळे आम्हाला नवी दृष्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांसमवेत डॉ. उल्हास पाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

Advertisements
New Project 6

याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. निखील चौधरी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अनिश कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, संजय महाजन, सबाह, बुशरा, तृप्ती यांनी या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.

दर वर्षी प्रमाणे या वेळी देखील डॉ उल्हास पाटील यांचा ६६ वा वाढदिवस निमित्ताने ६६ नेत्र रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत वाढदिवस भेट दिली आहे. सरांना गणेशाची सिद्धी, हनुमानाची भक्ती, चाणक्याची नीती, शारदेचं ज्ञान, भिष्माच वचन,कर्णच दान, कुबेराचा भंडार आणि भगवान धन्वंतरी ची काया मिळो हेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!

New Project 5

मोठया व्यक्तीच्या वाढदिवसानिमीत्त शिबिर म्हटले की मोफत असूनही पैसा खर्च होत असल्याचा अनुभव आहे पण पहिल्यांदाच आम्ही एकही रूपया न खर्च करता अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वार्ड, आपुलकीची सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवले तसेच डॉ.उल्हास पाटील इतके मोठे व्यक्तीमत्व असून आमच्यातलेच होवून वाढदिवस साजरा करतात असे म्हणत साधी राहणी उच्च विचारसरणीचे डॉ. उल्हास पाटील यांना दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories