---Advertisement---
आरोग्य जळगाव जिल्हा

श्री.गुलाबराव देवकर रुग्णालयात दर गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या तत्वाला अनुसरून श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दर गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगावकर नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

cataract surgery camp every thursday at shri gulabrao deokar hospital jpg webp

शिरसोली रस्त्यावरील श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांसाठी अनेक योजना लागू झालेल्या आहेत. मोतीबिंदू रुग्णांसाठी रुग्णालयाकडून दर गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

---Advertisement---

अत्यल्प दरात फेको शस्त्रक्रिया व कृत्रीम भिंगरोपन
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात दर गुरुवारी प्रथम २१ रुग्णांची अत्यल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कृत्रीम भिंगरोपन २५०० रुपयात तर अत्याधुनिक बिनाटाक्याची फेको शस्त्रक्रिया केवळ ६ हजारात केली जाणार आहे. गेल्या २१ वर्षापासून अविरत सेवा देणाऱ्या प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.वृषाली विवेक पाटील या शस्त्रक्रिया करणार आहेत.

मोफत तपासणी, अत्याधुनिक सुविधा
श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात नियमीत व मोफत तपासणी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात रुग्णांना अत्याधुनिक लेन्स, शस्त्रक्रियानंतरची औषधी, रुग्णाचे फिटनेस प्रमाणपत्र व रक्त तपासणी, रुग्णाच्या राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ.नितीन पाटील मो.7507724200, 9422977071 यावर संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---