रावेरात लाखोंची रोकड जप्त; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

नोव्हेंबर 14, 2025 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याच पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली असून या पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशातच रावेरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई करत दोन लाख 56 हजार रुपयांची रोकड जप्त केली. सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर ही कारवाई करण्यात आली.

pp

न.पा. निवडणुकीच्या अनुषंगाने बन्हाणपूर -अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सावद्याकडून येणाऱ्या वाहनांची शासकीय नवीन विश्रामगृहासमोर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी सुरू होती. याचदरम्यान एमएच 19 सीएफ 2385 या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये दोन लाख 56 हजारांची रोख रक्कम आढळली.

Advertisements

वाहनधारक कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांनी ही रक्कम बऱ्हाणपूर येथे सोयाबीन खरेदीसाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पथकाकडून पंचनामा करून रोकड जप्त करण्यात आली आहे.

Advertisements

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बंडू कापसे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके यांनी सीलबंद रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now