Bodwad : नकली नोटा देत फसवण्याचा केला प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नोव्हेंबर 28, 2025 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२५ । बोदवड तालुक्यातील नांदगाव येथे यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवून १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देतो, असे आमिष दाखवून सात जणांनी फिर्यादीकडून १ लाख रूपये हिसकावून फसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत चार संशयित जखमी झाले.

naklint

नाडगावच्या पोलिस पाटील प्रियंका भंगाळे यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांना माहिती दिली. गावात चार अनोळखी जणांना स्थानिकांनी चोरीच्या संशयावरून पकडून मारहाण केल्याचे सांगितले. माहिती मिळताच हवालदार अय्यूब तडवी व सहकारी घटनास्थळी धडकले. त्यांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले होते. यामुळे त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवले.

Advertisements

उपचारानंतर चौकशी करताना फिर्यादी संजयकुमार प्रेमचंद पिपलोदिया (४४, रा. सुसनेर, जि. आगर, मप्र) याने दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी उड्डाणपुलाजवळील निर्जन ठिकाणी सकाळी ६.३० वाजता नांदगाव आरोपींनी त्यांना बोलावून १ लाखाच्या बदल्यात ५ लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्यांनी लहान मुलांच्या खेळण्यातील ‘भारतीय बच्चो का बँक’ अशा नकली नोटा देत फसवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला.

Advertisements

यानंतर संशयितांनी त्यांचा व मित्र गिरीराज पवार यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने १ लाख रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी सय्यद साबीर, अंकल अशोक पारधी, करम किरण बोदडे, प्रज्ञात समाधान पाटील, सैय्यद मेरिफ, नीलेश पुरळ, विकी गुरचळ अशा सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एमएच.१९-बीके. १५२९ ही दुचाकी जप्त केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now