जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईत रिक्षाचालक असलेल्या जळगावच्या संशयित तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील ३९ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. वेळोवेळी तिच्याकडून तब्बल एक कोटी २० लाख रुपये घेत फसवणूक केली. मनोज दादाभाऊ निकम (वय-३५) असं संशयित तरुणाचे नाव असून त्याच्यासह त्याच्या आईवडिलांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, सांगली जिल्ह्यातील एक ३९ वर्षीय महिला नवी मुंबई येथे कंपनीमध्ये कार्यरत असताना जळगाव शहरातील भोईटे परिसरातील मनोज निकम याच्या रिक्षातून दररोज कंपनीतून ये-जा करीत असे. यातून तिची मनोज निकम याच्याशी ओळख वाढली. या महिलेला लग्नाची आमिष दाखविले त्यानंतर काही दिवस तिच्यासोबत राहिला. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर या पीडित महिलेला प्रॉपर्टी घेण्यासाठी सोन्याचे दागिने घेण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे लागत आहे, असे सांगून या महिलेकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये घेतले. दरम्यान या महिलेची फसवणूक करून लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर या पीडित महिलेने गुरुवारी ८ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज दादाभाऊ निकम वय-३६, दादाभाऊ निकम आणि उषा दादाभाऊ निकम तिघे राहणार भोईटेनगर जळगाव या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर हे करीत आहे.



