Chalisagaon : मेव्हणीला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देत केला विनयभंग
जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात भाड्याने घर शोधण्याचे सांगितल्याच्या रागातून बहिणीच्या नवऱ्याने मेव्हणीला अश्लिल शिवीगाळ करत गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव वनविभाग कार्यालयात नोकरी करणाऱ्या ३८ वर्षीय महिला ही शासकीय निवासस्थानी वास्तव्याला आहे. त्यांची बहिण व मेव्हणे हे चाळीसगाव शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. दरम्यान, महिलेने आपल्या मेव्हण्याला चाळीसगाव शहरात घर भाड्याने शोधण्याची विनंती केली.
या रागातून मेहण्याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेसह तिच्या बहिणीला देखील शिवीगाळ करत म्हणाला की तुला आणि तुझ्या बहिणीला गोळ्या घालून मारून टाकेल, आधिच माझ्यावर गुन्हे आहेत. माझे कुणीच काही करून शकत नाही, अशी धमकी दिली. दरम्यान महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मेव्हण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.