जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी (Jalgaon MIDC) भागात असलेल्या मानराज मोटर मारुती(Maruti) सर्व्हिस शोरूम आज (८ जानेवारी) सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आग आटोक्यात आली असून मात्र या आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत असे की, शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज सुझुकी शोरूमला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्या चा अंदाज शोरूम चे मालक अशोक बेदममुथा यांनी म्हटल आहे
ही आग आज सकाळी सात वाजेदरम्यान लागली असून काही वेळातच आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग, ॲक्सेसरीज विभाग हे आगीत जळून खाक झाले आहे. त्यामुळे मोठं नुकसान झाले असल्याचे शोरूम चे मालक अशोक बेदमूथा यांनी सांगितले आहे. आतापर्यंत अग्निशामक विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असून बारा बंब आग विझवण्यासाठी या ठिकाणी लागले आहे