जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद या गावादरम्यान पाटचारीजवळ कार आणि मिनिडोअरचा अपघात झाला. त्यात ७ जण जखमी झाले. या जखमींना यावल ग्रामीण रुग्णालय व काहींना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

यावल भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापासून यावलकडे येताना वाघळूदजवळ पाटचारी आहे. या पाटचारीजवळ यावलकडून भुसावळकडे जाणारी कार (एमएच.१९-इजी. २७८६) आणि भुसावळकडून यावलकडे येणारी मिनिडोअर (एमएच.१९-जे.८५७३) या वाहनांची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये नरेंद्र प्रेमचंद पाटील, रागिनी नरेंद्र पाटील, माधुरी गोकुळ पाटील, भावना नंदकिशोर पाटील (चौघे रा. सावखेडासिम ता. यावल), दीपक पाटील व शिवांशू पाटील (दोघे रा. यावल) आणि मिनीडोअर चालक असे सात जण जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालय व काहींना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.