केरळी महिला ट्रस्टच्या कार्तिक स्वामी मंदिरात दोन दिवस भक्तांची मंदियाळी
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दि १५ रोजी खुले करण्यात आले व १६ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आले. यावेळी पो. अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांचे सह जळगाव शहर विधानसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांनी भगवान कार्तिक स्वामींना विधीवत पूजा करून साकडे घातले.
संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. आकर्षक रोषणाई व मंडपाची सजावट करण्यात आलेली होती. पो. अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांनी जिल्हयात शांतता तर उमेदवारांनी विजयासाठी साकडे भगवान कार्तिक स्वामींना घातले. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात.
१५ नोव्हें रोजी अयप्पा स्वामी मंदिराचे दरवाजे सर्वसामान्याकरीता खुले करण्यात येउन विधीवत पूजा देखिल करण्यात आले. लाखो भाविकांनी अत्यंत शिस्तीत दर्शनाचा लाभ घेतला. याचवेेळी अभिषेक करीत अनेक भावीकांनी नवस देखिल मागीतला. संस्थापक अध्यक्ष वासंती अयर यांचेसह सर्व केरळी बांधव यावेळी उपस्थीत होते.