⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | Jalgaon : उमेदवारांनो.. नामनिर्देशन अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या

Jalgaon : उमेदवारांनो.. नामनिर्देशन अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ०३ जळगाव व ०४ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे. नामनिर्देशनपत्रावर एक व त्यासोबत छायाचित्र सादर करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी छायाचित्र सादर करणेबाबत अलीकडील 3 महिन्यात काढलेले छायाचित्र सादर करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले निर्देश पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जा सोबत सादर केलेले छायाचित्र हे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमूना 7 अ मधील यादीवर व सर्व मतपत्रिका यावर सुद्धा छापण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी छापील छायाचित्रासोबतच छायाचित्राची सॉफ्टकॉपी ०३ जळगाव मतदारसंघाच्या बाबतीत [email protected] व राबेर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत [email protected] या ईमेल आईडीबर सादर करावी व सोबत उमेदवाराचे नाव नमूद करावे. सॉफ्टकॉपी स्वरुपात उमेदवारांनी ई मेलवर सादर केलेले छायाचित्र हे भारत निवडणूक आयोगाच्या विविध पोर्टलवर तसेच मतपत्रिकेवर छपाईकामी वापरात येणार असल्याने उमेदवारांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी.

छायाचित्राबाबतच्या महत्त्वाचे मुद्दे :
नामनिर्देशनपत्रावरील छायाचित्र व सॉफ्टकॉपी सारखी असावी. छायाचित्र हे अलीकडील किमान तीन महिने कालावधीतील म्हणजेच अधिसूचनेच्या दिनांकाच्या ०३ महिन्यांच्या कालावधीपूर्वी काढलेले असावे. छायाचित्र हे २ cm x २.५ cm (२ cm रुंदी व २.५ cm उंची) आकाराचे असावे. छायाचित्र काढताना उमेदवाराचा संपूर्ण चेहरा कॅमेऱ्याकडे असावा, डोळे उघडे असावेत व चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसावेत. छायाचित्र हे रंगीन किंवा Black & White असेल तरी चालेल. छायाचित्र हे साधारण कपड्यात काढलेले असावे. कोणताही विशीष्ट पोषाख परिधान केलेला नसावा तसेच टोपी, काळ्या काचेचा चष्मा घातलेला नसावा. छायाचित्र सादर करताना विहित नमुन्यातील घोषणापत्र सोबत सादर करावे. असे अहवान आयुष प्रसाद, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.