---Advertisement---
जळगाव जिल्हा

14 ते 22 जुलैपर्यंत भुसावळमार्गे धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । भुसावळमार्गे तुम्हीही इटारसीकडे रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भुसावळ-खंडवा विभागातील गेज रूपांतरण आणि खंडवा यार्ड सेमॉडेलिंगशी जोडल्याने प्री-एनआय आणि एनआय काम केले जात आहे. या कामाचा परिणाम म्हणून काही प्रवासी गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार आहे. भुसावळ मार्गे धावणाऱ्या इटारसी, कटणीसह १२ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

train 1

या गाड्या रद्द:
यात भुसावळ येथून १४ ते २२ जुलै दरम्यान सुटणारी ११११५ भुसावळ-इटारसी व ११११६ इटारसी-भुसावळ एक्स्प्रेस रद्द राहील. १९०१३ भुसावळ-कटनी ही गाडी धावणार नाही. १५ ते २३ जुलैपर्यंत १९०१४ कटनी-भुसावळ एक्सप्रेस, १४ ते २१ जुलैपर्यंत ०२१८५ रिवा-सीएसएमटी एक्सप्रेस, १५ आणि २२ जुलै रोजी ०२१८६ सीएसएमटी-रिवा, १४ आणि २१ जुलै रोजी ०२१३२ जबलपूर-पुणे, १५ आणि २२ जुलै रोजी ०२१३१ पुणे-जबलपूर १५, १७ आणि २० जुलै रोजी १२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ, २० जुलै रोजी २२१७२ कमलापती-पुणे एक्सप्रेस तसेच २१ जुलै रोजी २२१७१ पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस रद्द असेल.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---