जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२। येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूडेसिम अॅम्बेसेडर्स-आयबीएम या नामांकित कंपनीतर्फे ऑनलाइन कॅम्पस ड्राइव्ह घेण्यात आले. यात निवड झालेल्या विद्यार्थांना ४.६ लाखांचे पॅकेज देण्यात येणार आहे.
न्यूडेसिम अॅम्बेसेडर्सच्या माध्यमातून ऑनलाइन कॅम्पसमध्ये महाविद्यालयाच्या ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांची ऑनलाइन टेस्ट घेण्यात आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीत तांत्रिक चर्चा घेण्यात आली. तिसऱ्या फेरीत एचआर राऊंड झाला. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे वार्षिक ४.६ लाखांचे पॅकेज देण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ.विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद गोसावी व प्राध्यापक उपस्थित हाेते.