जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगाव या कार्यालयातील कर्मचारी शासकीय कामकाजाकरिता भारतीय स्टेट बँक, रावेर येथे जात असताना सोबत असलेल्या शासकीय कागदपत्रांपैकी भारतीय स्टेट बैंक, रावेर या शाखेचा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्या. जळगांव यांना उद्देशून लिहीलेला धनादेश क्र. 015405 दि. 2 मार्च, 2023 (Account Payee असे चिन्हांकित केलेला) हा नजर चुकीने गहाळ झाला आहे.
हा धनादेश कोणास आढळून आल्यास/सापडल्यास कार्यालयास कामकाजाच्या वेळेत जमा करावा. अथवा श्री. अ. इ. तडवी, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्र. 8668817893 वर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.