⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

प्रामाणिकपणे काम केल्याने जळगाव ग्रामीणमध्ये मोठा लीड ; मंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । जळगाव ग्रामीण हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात आम्ही सर्वांनी लोकसभेत भाजप उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच ६३ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य देऊ शकलले. आम्ही गद्दार राहिलो असतो तर एवढे मोठे मताधिक्क्य मिळाले नसते, असे प्रतिपादन लोकसभेच्या निकालानंतर पाळधी येथे बुधवारी झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हेच आपल्यासाठी ऊर्जास्त्रोत आहे. कार्यकर्ते हे माझ्यासाठी ऑक्सिजन असून, आपण कायम लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले आहे. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत आपण भेदभावाचे आणि जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही असेही ते म्हणाले. भाषणात त्यांनी संजय राऊतांसह विरोधकांचा समाचार घेतला.

नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पालकमंत्री म्हणजे, कर्तृत्व व नेतृत्वाचा संगम असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, अॅड. संजय महाजन, सुभाष पाटील, राजेंद्र चव्हाण, सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले