जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । भडगाव तितुर नदी अलीकडे भडगांव-पाचोरा वळणावर बस व टेम्पो मध्ये भिषण अपघात सुदैवाने जिवीत हानी झाली नसून मात्र १९ प्रवासीं जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांचेवर उपचार करण्यात आले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी घडली.
विठ्ठलवाडी – मलकापुर बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी.२७६९ पाचोरा कडे जातांना वळणावर पाचोराहून चाळीसगांव कडे जाणारा टेम्पो क्रमांक एम.एच.१९ सी.वाय.२५०२ या वाहनास भरधाव येणार्या बस ने गाडी ओव्हरटेक करत असतांना धडक दिली.अपघात ईतका भिषण आहे की टेम्पो मधील किराणा माल व तेलाची टाकी फुटून रस्त्यावर तेल सांडले गेले. किराणाने भरलेली टेम्पो कजगांव येथिल गुरूद्त किराणा यांची असून टेम्पोतिल ड्रायव्हरसुद्धा थोडक्यात बचावले परंतू बस मधील बसलेले १९ प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनास्थळी जखमी झालेले प्रवासी यात १) सुनिता गुलाबराव पाटील. वय २८ वर्ष. रा.महादेवगल्ली भडगाव. २) जय गुलाब पाटील. वय ९ वर्ष.रा.महादेव गल्ली भडगाव ,३) गुलाबराव पाटील. वय ३२ वर्ष. रा.महादेव गल्ली ४) दिपक रोहीदास पाटील . वय ३२ वर्ष. रा.लोणपिराचे ,५) काव्या गुलाबराव पाटील. वय ३ वर्ष. रा.महादेव गल्ली ,६) संजय पंडीत चौधरी. वय ५२ वर्ष. रा.सातगांव, ७) शुभांगी विलास पाटील. वय १८ वर्ष. रा.लोहारी, ८) विकास मुकूंदा वराडे. वय ४७ वर्ष. रा.जामनेर, ९) निर्मलाबाई शिवाजी पाटील. वय ४५ वर्ष. रा.वाडी शेवाळे, १०) रमेश चिंतामण पाटील. वय ५९ वर्ष.रा.सामनेर ,११) लिलाबाई भास्कर पाटील. वय ६२ वर्ष. रा.लोहारी ,१२) मोनिका भारत राऊत. वय ३५ वर्ष. रा.पिंपळगाव हरेश्वर ,१३) राज विकास वराडे. वय ११ वर्ष. रा.जामनेर, १४) लताबाई पाटील. वय ७१ वर्ष.रा. जामनेर .१५) सुनिता वराडे. वय ५० वर्ष.जामनेर . १६) रुषद भरतराव राऊत. वय ३ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. १७) राज विकास वराडे. वय. ११ वर्ष. रा. जामनेर. १८) भारत सुभाष राऊळ. वय ३८ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. १९) भाग्यश्री भारत राऊळ. वय ३५ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. अशी जखमींचे नावे असुन ही घटना कळताच भडगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पंचनामा करण्यासाठी पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले.
काही प्रवाशांचे दात पडलेले आहेत. तर काही प्रवाशांना डोक्याला मार लागला आहे. एका प्रवाशाचा पाय फ्रक्चर झाला आहे. या जखमी प्रवाशाला समर्पण हाऊसस्पीटलला उपचारासाठी दाखल केले आहे. ५ जखमी प्रवाशांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे. इतर जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयातुन घरी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या सुञांनी दिली. या घटनेमुळे नुकसान झालेल्या टेम्पो व किराणा माल यांची भरपाई व जखमी झालेल्या प्रवाश्यांनाही भरपाई मिळावी अशी प्रवाशांची व टेम्पोधारकाची मागणी आहे.सायंकाळी उशीरापर्यंत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरु होते.