जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२४ । राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच नाशिकच्या नांदगाव – संभाजीनगर रस्त्यावर बस व मारुती कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २ वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली.
या अपघात मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले.
बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.