---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

कन्नड घाटात प्रवाशांनी भरलेली बस कोसळली ; २० ते ३० प्रवाशी जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात मध्य प्रदेशच्या परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १० ते १५ फुट खाली कोसळली. ही बस संभाजी नगरहून मध्यप्रदेशकडे जात होती. या अपघातात २० ते ३० प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले असून जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

नेमकी घटना काय?
मध्यप्रदेश राज्याची परिवहनची बस क्रमांक (एमपी १३ पी ३९५४) ही आज छत्रपती संभाजीनगर होऊन मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी कन्नड घाटातून निघाली. मात्र आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याजवळून जात असतांना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १० ते १५ फूट खाली गेली.

---Advertisement---

या अपघातात २० ते ३० जण जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ग्रामीण पोलीस व प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---