---Advertisement---
जळगाव शहर वाणिज्य

BSNL च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज ; जळगावमध्ये ‘या’ तारखेपासून सुरु होणार 4G, 5G सेवा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । देशात नुकतेच 5 जी सेवा सुरु करण्यात आलेली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. मात्र बीएसएनएलची 4 जी सेवा अजूनही सुरू झाली नाही. अशातच बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगावमध्ये बीएसएनएलची 4 जी सेवा मार्च २०२३ मध्ये सुरु होणार आहे. तर 5 जी सेवा ऑगस्ट २०२३ मध्ये यात खासगी कंपन्यांची ही सेवा विदेशी तंत्रज्ञानावर आधारित असली तरी बीएसएनएलची 4 जी व 5 जी सेवा संपूर्णत: मेकिंग इंडिया अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित राहणार असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.

bsnl jpg webp

बीएसएनएल सोडून इतर खासगी कंपन्यांची 4 जी, तर काही शहरात 5 जी सेवा सुरू आहे. मात्र, यात बीएसएनएल अजूनही 3 जी सेवेवरच अडकली आहे. मात्र अशातच आता मार्चपर्यंत 4 जी तर ऑगस्टपर्यंत 5 जी ही संपूर्ण देशी टेक्नॉलॉजीने युक्त अशी इंटरनेट सेवा जळगावात सुरू होणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेटचा डाटा स्पीड मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.

---Advertisement---

बीएसएनएलचे कामगार कपात धोरण, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती, यात भर म्हणजे इतर खासगी कंपन्यांचे वाढणारे ग्राहक तर बीएसएनएलचे घटनारे ग्राहक ही मोठी चिंतेची बाब आहे. मात्र, अजूनही सर्वसामान्य ग्राहकांचा बीएसएनएलवर भरवसा आहे. 4 जी व 5 जी इंटरनेट सेवा शहरात दाखल झाल्यानंतर ग्राहकांमध्ये वाढ होईल. त्यामुळे बीएसएनएलसाठी 4 जी व 5 जी इंटरनेट सेवा नवसंजीवनी ठरू शकेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---