जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सीमा सुरक्षा दलात म्हणजेच BSF मध्ये बारावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. BSF ने एकूण 247 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पुरुष उमेदवार तसेच महिला उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी पात्र उमेदवारांनी www.bsf.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 21 मे 2023आहे. BSF Recruitment 2023
कोणती पदे भरली जाणार?
अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) च्या 217 पदे आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या 30 पदांची भरती करायची आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र, बारावीनंतर आयटीआय केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
10वी+ITI पास उमेदवारांसाठी महावितरण मध्ये मोठी संधी
वयो मर्यादा :
अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 12 मे 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
किती पगार मिळेल ?
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-4 रु. 25500/- ते 81100/- 7 व्या CPC नुसार पगार मिळेल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023 21 मे 2023