नोकरी संधीबातम्या

BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (Border Roads Organisation) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. BRO Recruitment 2025

या भरतीमार्फत विविध पदे भरली जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ जानेवारीपासून सुरु झाली असून २४ फेब्रुवारी २०२५ या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीद्वारे एकूण 411 जागा भरल्या जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज मुदतीपूर्व करावा. BRO Bharti 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) MSW (कुक) –
153
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
2) MSW (मेसन) -172
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
3) MSW (ब्लॅकस्मिथ) -75
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
4) MSW (मेस वेटर)- 11
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षा, पीईटी, प्रॅक्टिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5200/- ते 20200/- पर्यंत पगार मिळेल

इथे पाठवावा लागेल अर्ज?
या नोकरीसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांना फिजिकल टेस्टसाठी GERF,सेंट्र, डिग्गी कॅम्प, आळंदी रोड, पुणे ४११०१५ येथे बोलवले जाईल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button