⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

म्हणे वाऱ्या मुळे पुल पडला; नितीन गडकरींनी मारला डोक्याला हात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । बिहारमध्ये बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला, तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारण विचारले, तेव्हा आयएएस अधिकाऱ्याच्या वक्तव्याने ते आश्चर्यचकित झाले. जोरदार वारा आणि वादळामुळे हा ब्रिज पडल्याचं कारण त्यांच्या सचिवांनी दिलं.

आयएएस अधिकाऱ्याच्या वक्तव्याने धक्का बसला
गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी वादळात सुलतानगंजमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या पुलाचा काही भाग पडला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. येथे आयोजित एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, ‘बिहारमध्ये २९ एप्रिल रोजी पूल कोसळला होता. त्यांच्या सचिवांना याबद्दल विचारणा केली केली. यावेळी सचिवांच्या उत्तराने ते चकित झाले आहे.

जोरदार वाऱ्यामुळे पूल कोसळला असे त्यांच्या सचिवाने उत्तर दिले. आयएएस अधिकारी यांच्या अशा स्पष्टीकरणावर विश्वास कसा ठेवू शकतो, असा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना पडला. गडकरी म्हणाले, ‘वारा आणि धुक्यामुळे पूल कसा कोसळला हे समजत नाही? काहीतरी चूक झाली असावी ज्यामुळे हा पूल कोसळला.

कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता पुलांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यावर भर दिला. बिहारमधील सुलतानगंज आणि अगुआनी घाट दरम्यानच्या या पुलाचे बांधकाम 2014 साली सुरू झाले. त्याचे बांधकाम 2019 मध्येच पूर्ण होणार होते, परंतु अद्याप ते पूर्ण झालेले नाही.