जळगाव लाईव्ह न्यूज | १८ जानेवारी २०२३ | जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा दणकाचा लावला असून गेल्या आठवड्यात एकावर एमपीडीएची कारवाई करण्यात आल्यानंतर आज पुन्हा एकाला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम देशमुख वय-२४ रा.अमळनेर असे गुन्हेगाराचे नाव आहे.
शुभम देशमुखविरुद्ध अमळनेर शहरातील अमळनेर पोलीस स्टेशनला ३ खुनाचा प्रयत्न, ९ घरफोडी, १ दरोडा, ५ जबरी चोरी, ६ चोरी, १ पोलीस रखवालीतून पळून जाणे, ४ सरकारी नोकरावर हल्ला, १ आर्म अॅक्ट असे एकूण २७ गुन्हे दाखल असून त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता.
शुभमची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्यासोबत असणाऱ्या गुंडासोबत घातक शस्त्रेसोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आव्य घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यवती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते.
अमळनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याचे विरुध्द चौकशी पूर्ण करून दि.३ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक जळगांव एम. राज कुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक यांनी प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी जळगांव यांचेकडे पाठविलेला होता. त्यानुसार आज दि .१८ रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे कडील आदेश क्र. दंडप्र/कावि/एम.पी. डी.ए./३८/२०२३ दि. १८/०१/२०२३ अन्वये सदर अधिनियमान्वये शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख वय २४ रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केला.
आदेशानुसार पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे व उपविभागीय पो.अधिकारी राकेश जाधव, अमळनेर भाग याचे मागदर्शनाखाली स्थागुशा जळगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, व अमळनेर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानी स्था.गु.शा. कडील व अमळनेर पोस्टे कडील संयुक्त पथक तयार केले. पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोना किशोर पाटील, पोन सिध्दार्थ शिसोदे सर्व नेम, अमळनेर पो.स्टे. व सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे अशांनी दि.१८ रोजी त्यास ताब्यात घेवून त्यांची जिल्हादंडाधिकारी याचे आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक या कारागृहात रवानगी केली आहे.