जळगाव जिल्हा

Breaking : पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । जिल्ह्यातील आगामी पंचायत समिती सभापतीपदांसाठी आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यात अनुसूचित जाती महिला – १, अनुसुचीत जमाती-२, अनुसुचीत जमाती महिला-१, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-१, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-२ असे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला-४ असे आरक्षण निघाले आहे.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत संपली असून तेथे सध्या प्रशासक राज सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने आज पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पारोळा येथे सभापतीपद अनुसुचित जाती महिला तर भुसावळ आणि बोदवड येथे अनुसुचीत जमाती तर चोपडा येथे अनुसुचित जमाती महिला असे आरक्षण निघाले आहे. जळगाव आणि एरंडोल येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर धरणगाव येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण निघाले.

दरम्यान, रावेर, भडगाव, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव येथे सर्वसाधारण महिला या प्रवर्गातील सभापती होणार आहेत. तर, अमळनेर, जामनेर, पाचोरा आणि यावल येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सभापती होणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button