जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली.
याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली, आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती समोर आलीय.

बांगलादेशी आणि रोहिंगयांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचं काम सुरू असून दररोज 100 नोंदी रद्द केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे






