जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील गाडऱ्या गावाजवळील वनक्षेत्रात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिस पथक दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. या महिलेचा खून झाल्याचा संशय असून तिची ओळख पटली नाही. मंगळवारी अप्पर पोलिस अधीक्षक डीवायएसपी, पोलिस निरीक्षकांचे पथक सातपुड्याकडे रवाना झाले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेखी यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीने अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना घटनास्थळावर जाऊन भेट देण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी रवाना झाले, पोलिस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलिस नाईक वसीम तडवी हे देखील गेले.
महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तुर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, तपास पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहे. या गटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून सखोल चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.