⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | बोदवड नगरपंचायत निवडणूकीचे नवीन आरक्षण जाहीर

बोदवड नगरपंचायत निवडणूकीचे नवीन आरक्षण जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दि.१५ नोव्हेंबर २०२१ । बोदवड शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसिलदार प्रथमेश घोलप व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर झाले. यात विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात महिला आरक्षण निघाल्याने विद्यमानांसह इच्छुक उमेदवारांचा हिरेमोड झाला आहे.

येत्या महिन्यात नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. त्यानिमित्त इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असुन जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात महिला आरक्षण सुटल्याने नगरसेवकांचा हिरेमोड झाला आहे. त्यामुळे हायव्होल्टेज समजल्या जाणाऱ्या लढती शांत झाल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु , आरक्षणाच्या सोडतीमुळे अनेकांचे ‘टांगे पल्टी, घोडे फरार’ झाले आहेत.

नगराध्यक्ष पदाबाबतचे आरक्षण येत्या दहा ते बारा दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये इच्छुक उमेदवारांचा सुळसुळाट सुटला होता. परंतु, अनुक्रमे एसटी व एससी सर्वसाधारण आरक्षण सुटल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

प्रभाग निहाय आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक 1) जनरल स्त्री
प्रभाग क्रमांक 2) ओबीच पुरुष
प्रभाग क्रमांक 3) ओबीसी महिला
प्रभाग क्रमांक 4) वार्ड जनरल महिला
प्रभाग क्रमांक 5) जनरल
प्रभाग क्रमांक 6) जनरल महिला
प्रभाग क्रमांक 7) एसटी सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8) एससी सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9) जनरल
प्रभाग क्रमांक 10) जनरल महिला
प्रभाग क्रमांक 11) जनरल महिला
प्रभाग क्रमांक 12) जनरल महिला
प्रभाग क्रमांक 13) जनरल
प्रभाग क्रमांक 14) जनरल
प्रभाग क्रमांक 15) OBC पुरुष
प्रभाग क्रमांक 16) जनरल महिला
प्रभाग क्रमांक 17) ओबीसी स्री

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.