समाज कल्याण विभागात रक्तदान शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक, आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सोमवारी ११ एप्रिल रोजी महाबळ येथील समाजकल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सहकार्याने व पोलीस प्रशिक्षणार्थी प्रमुख सोपान पाटील यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यासह इतर १०० जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यान प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.
रक्त संकलन रेडक्रॉस सोसायटीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. ए.डी. चौधरी, जनसंपर्क अधिकारी रोहिणी काळे, रूपाली बडगुजर, मंगेश ओतारी, दीपक सुरडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक अरुण पाटील, समाज कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक आर.डी. पवार, ए. के. बोरोले, एम.ए.चौधरी, तालुका समन्वयक जितेंद्र धनगर, चेतन चौधरी, किशोर माळी, महेंद्र पाटील, शिला अडकमोल, अनिल पगारे यांच्यासह आदी उपस्थित होते.