⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । अ.भा. महात्मा फुले समता परिषद युवक आघाडीच्या वतीने क्रांतसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम महात्मा फुले समता परिषदेच्या युवक आघाडी व समता विचार फाउंडेशन तर्फे घेण्यात आला होता. रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला शिबिरात ८० बॉटल रक्त संकलन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व ५० हजार रूपयांचा विमा देण्यात आला. शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेविका सरिताताई नेरकर, अतिरिक्त आयुक्त वर्षा गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष नविदिता ताठे, प्रकाश पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, राजपूत करणी सेने चे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, रामु सैनी, गजानन महाजन, शुभम नेरकर, रूपाली नेरकर, अरूण चौधरी, नंदु पाटील, भारती काळे, कृष्णा महाजन, समता परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच विविध समाज व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देवून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन केले.

महात्मा फुले यांचा भव्य पुतळा उभारणी तसेच पुतळ्याजवळील परिसर सुशोभिकरण करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार राजू मामा भोळे यांनी यावेळी दिले. सर्व मान्यवरांनी समता परिषदेच्या युवक आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतूक केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिशचंद्र सोनवणे व वसंत पाटील यांनी तर आभार भूषण महाजन यांनी केले. यापुढे अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने एकजूट होवून विविध कार्यक्रम राबविले जातील. महापौर जयश्रीताई महाजन यांनी देखील पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जिल्हा सरचिटणीस नितीन महाजन, महानगर कार्याध्यक्ष हेमरत्न काळुंखे, शहर संघटक शैलेश परदेशी यासह सर्व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.