जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेत भाजपने अखेर खाते उघडले असून प्रभाग क्रमांक १२ ब मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात छाननीत दोघंही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून आणि एकमेकाला पेढे भरवून जल्लोष करण्यात आला
उज्वला बेंडाळे या भाजपच्या माजी जळगाव शहरप्रमुख होत्या. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. दरम्यान बिनविरोध झाल्यानंतर उज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत.

उज्वला बेंडाळे यांनी उद्यापासून आपण आपल्या प्रवर्गासह शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासह प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.






