भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा ठरली फेल : नागरिकांनी घेतला काढता पाय

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची औरंगाबाद येथे झालेली सभा फेल ठरल्याचे म्हटले जात आहे.कारण यामुळे त्यांचे भाषण सुरु असताना नागरिक खुर्चीवरून उठून गेले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली विराट जाहीर सभा असा दावा भाजपतर्फे करण्यात आला होता. मात्र भाजपचा आज चांगलाच फ्लाॅप शो झाला.

लोक उठत असतांना प्रसार माध्यमांचे कॅमेरे ते टिपण्यासाठी वळताच व्यासपीठावरील नेत्यांचे चेहरे पडले. विरोधी पक्षाने यावरून आता भाजपला डिवचण्यास सुरूवात केली आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो ट्विट करत अहो नड्डा पहा हा खड्डा, असा टोला लगावला आहे.

एकंदरित भाजपच्या शक्तीप्रदर्शनाचा फ्लाॅप शो झाल्याने स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली. औरंगाबादेतील सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नाही हे समजल्यावर गर्दी पांगायला सुरुवात झाली होती. दुपारी चार वाजेपासून लोक सभास्थळी आणण्यात आल्यामुळे नेमकं नड्डा यांच भाषण सुरू असतांनाच लोक उठून जावू लागले..